पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/108

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


जननिष्ठ समाजशिक्षक : कॉ. गोविंदराव पानसरे

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf

 आचार-विचारांचं आजीवन अद्वैत साधणं फार कमी माणसांना जमतं... ते जमवण्यासाठी विचारांची स्पष्टता व बांधिलकीचं भान असणं आवश्यक असतं विचार नि कृतीत सातत्य येतं ते अशा अटळ जीवन तत्त्वज्ञानातून. जीवन त्यांना कळलं हो' म्हणणाऱ्या कवीपुढे असतात वरील ओळी सार्थ करणाच्या गोविंदराव पानसरेंसारख्या व्यक्ती. आपल्याकडे आपण माणसास मोकळेपणानं संपूर्णपणे स्वीकारत नसल्यामुळे ब-याचदा माणसाचं मूल्यमापन योग्य. साजेसं होत नाही. तसं ते योग्य वेळीही होत नाही. कोल्हापूरच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक,आर्थिक जडणघडणीत श्री. पानसरे यांनी आपल्या विचार व व्यक्तित्वाचा कधीही पुसून न टाकता येणारा असा वाटा उचलला आहे. विद्यार्थिदशेत असल्यापासून ते आजपावेतो सतत समाजसाठी झटणारा कायकर्ता म्हणून त्यांचे चरित्र माझ्यासारख्या नव्या पिढीच्या कार्यकर्त्याला सतत आपणाकडे आकषिर्त करत असतं; त्यात व्यक्तित्व प्रभावापेक्षा कार्यकतृत्वाचा ठसा मोठा असल्याचं सतत जाणवतं!

 गोविंदराव पानसरे तसे मुळचे नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील कोल्हारचे. वडील पंढरीनाथ पानसरे छोटेसे शेतकरी. पुढे शेती गेली नि छोट्या-मोठ्या नोकऱ्या करत राहिले. आई शेतमजूर. घरच्या ओढग्रस्त स्थितीत शिक्षण घेणे अशक्य म्हणून ते नगरला आले. तिथं पत्की नावाच्या एका शिक्षकाचं छत्र नि मार्गदर्शन लाभलं. ते कोल्हापूरला आले. छत्रपती शाहू महाराजांनी इथं सुरू केल्या अनेक बोर्डिंगापैकी प्रिन्स शिवाजी बोर्डिंगमध्ये त्यांनी प्रवेश घेतला.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१०७