पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/107

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बनवनू टाकतात. मूल्यांशी प्रतारणा होणार नाही अशी ते सतत खबरदारी घेतात. कार्यात घराणेशाही त्यांना पसंत नसते. गुणवत्ता हा यशप्राप्तीचा ते राजमार्ग मानतात. शिक्षणास ते धर्मादाय कार्य न मानता राष्ट्रासाठी केलेली भविष्यलक्ष्मी पेरणी, गुंतवणूक म्हणून ते स्वीकारतात. अल्पमतात असतानाही विचार निष्ठेच्या बळावर बहुसंख्यांकांवर कुरघोडी करायची निर्भयता दाखवावी एनडींनींच. विचार व आचाराची दरी रुंदावत असतानाच्या काळात त्यांच्या जीवन, कर्माचं ऐतिहासिक मूल्य आहे. समाज गणु ग्राहक व्हायचा तर गुणगौरव अनिवार्य असतो. प्रा. एन. डी. पाटील यांचा होणारा प्रत्येक गौरव रया गेलेल्या रयतते पुन्हा एकदा गतचतैन्य भरेल.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१०६