पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/105

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 कोपरा सभातील तरुण एन.डींच्या घणाघाती भाषणांचा मी साक्षीदार आहे. पुढे आमदार म्हणून त्यांनी केलेले कार्य पाहिलं आहे. सहकार मंत्री असताना एक सामाजिक कायकर्ता म्हणून त्यांना भेटण्या, बोलण्याचा, निवेदन देण्याचा योग आला. त्यांची विधान परिषदेतील काही भाषणं ऐकल्याचं आठवतं. तो काळ माझ्या मंत्रालयातील येरझाऱ्याचा होता. या काळात मी अनुभवलंय की, या माणसामागे सतत कार्यकर्त्यांच मोहोळ असायचं.
 प्रस्थापिता विरोधी सतत लढा दते त्यानी कार्य विचाराचं पुरोगामीपण, डावंपण जपलं. मधुकरराव चौधरी शिक्षणमंत्री असताना त्यांनी श्वेतपत्रिका जाहीर करून आपण शिक्षणात क्रांती घडवून आणत असल्याचा आव आणला. प्रा. एन. डी. पाटील यांनी महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे कृष्णस्वरूप ‘कृष्ण पत्रिका' पुस्तिका प्रकाशित करून त्यातील फाले पणा स्पष्ट के ला. प्रा. एन. डी. पाटील यांनी आंदोलन, चळवळीबरोबरच प्रबोधनपर लेखनही विपुल केलं.
 सत्ताधारी असताना तत्त्व जपणारा अपवाद मंत्री म्हणून एन.डीचं लौकिक केवळ वादातीत. मुलास नियमाने प्रवेश घेणे, मंत्री म्हणून सवलती न घेणं, सत्तेबाहेर सत्ताकेंद्र विकसित न करणं, उपकृत न होणं इ. सारखे त्यांनी जाणीवपूर्वक पाळलेले नियम त्यांना निष्कलंक कार्यकर्ता, नेता, मंत्री, मित्र, सहकारी म्हणून नेहमी अग्रभागी ठेवत आलेत. एन्रॉन आंदोलन, जागतिकीकरण विरोधी चळवळ इ. पुरोगामी विचारवेधी कृतीचं नेतृत्व त्यांच्याकडे होतं ते आचार व विचारांच्या अद्वैतामुळे. हाकेसरशी पाच-दहा हजार माणसं जमवायची हिंमत असणारे एनडी म्हणजे 'नॉन डिस्पुटेबलपर्सन' म्हणून सर्वपरिचित आहेत.
 प्रा. एन. डी. पाटील यांचं नि रयत शिक्षण शिक्षण संस्थेचं अतूट असं नातं आहे. प्रथम विद्यार्थी नंतर शिक्षक, सदस्य, कार्यकारी सदस्य, आजीव सेवक, पदाधिकारी व अध्यक्ष अशा अनेक विणीतून रयतशी असलेलं त्यांचे संबंध दृढ होत गेले. पण आपली नाळ कायम रयतेशीच जोडून ठेवली.

 कर्मवीर भाऊराव पाटील यांची मृत्यूपूर्व अंतिम इच्छा म्हणून रयत शिक्षण संस्थेने त्यांना सभासदत्व बहाल केलं. शिक्षणाच्या क्षेत्रात अध्यापन, प्रशिक्षण, लेखन अशा त्रिवीध मार्गांनी त्यांनी आपली छाप उमटवली. विद्यापीठीय व्यवस्थापनात सिनेट सदस्य, सल्लागार, तज्ज्ञ, कार्यकारी सदस्य, अधिष्ठाता म्हणून केलेल्या कार्याची लोक आजही आठवण काढत राहतात. रयत शिक्षण संस्थेचा चेहरा एन. डी. पाटील यांनी अनेक उपक्रमांतून

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१०४