पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/104

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पत्री सरकारच्या प्रभावाचा तो काळ. किशोर वयातच यांनी दारूबंदी आंदोलनात भाग घेतला नि त्यांना अटक झाली.
 पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात दाखल झाले. इथे त्यांना डॉ. आप्पासाहेब पवार, डॉ. विनायक गोकाक यांच्यासारखे इतिहास तज्ज्ञ, इंग्रजीचे व्यासंगी प्राध्यापक म्हणनू लाभले. विद्यार्थी चळवळीत सतत सहभाग, अभ्यास वर्गांना उपस्थिती, शिबिरात सक्रियता, चळवळीतला सतत संचारता सा-यांतून त्यांच्यातील ध्येयवादी आकारला. शंकरराव मारे यांचे ‘जनसत्ता' पत्र ओरडत विकणारा नारायण 'कमवा व शिका'चे धडे गिरवत आचार्य जावडेकर, कार्ल मार्क्स, महात्मा गांधी वाचू लागला व बघता बघता पुरोगामी बनला. सन १९४८ च्या गांधी हत्येच्यावेळी महाराष्ट्रात मोठी जाळपोल झाली. त्या वेळी पदवीधर झालेले एन. डी. आष्ट्याच्या ट्रेनिंग कॉलेजात शिकत होते. इथे त्यांनी गनीसाहेब आत्तारांचा सत्याग्रह पाहिला. एन. डी. पाटील निर्भय सत्याग्रही म्हणून आज आपणास दिसतात. त्यामागे संस्कार आहेत गनीसाहेब आत्तारांच्या निर्भय सत्याग्रहाचे. इथेच त्यांची भेट कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी झाली. वडील व भाऊ एकाच वर्षी निधन पावले. निर्धन नारायणाला आईने कर्मवीरांकडे सुपूर्द केले. एन. डी. कर्मवीराचे आज्ञापालक विद्यार्थी बनले. कर्मवीर भाऊरावांनी त्यांना आपल्याच रयत शिक्षण संस्थेत प्राध्यापक करून स्वावलंबी बनवलं.
 प्रा. एन. डी. पाटील केवळ पुस्तक शिकवणारे शिक्षक नव्हते. त्यांच्यात एक समाजशिक्षक सतत जागा असायचा. शिकवायची खरी जागा त्यांनी जाणलले हाते . तो काळ त्यांच्या वैचारिक द्वंद्वाचा होता. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा त्याग, सेवा एकीकडे खुणावत असताना दुसरीकडे केशवराव जेधे, शंकरराव मोरे, दत्ता देशमुख प्रभृतींचा शेतकरी संघ आकषिर्त करीत असायचा. एनडींनी शेतकरी, कामगाराचं कार्य करायचं पसंत केलं पुढे ते विधिवत स्थापन झालेल्या शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते झाले. मजल दरमजल करत ते या पक्षाचे सरचिटणीस झाले. कायकर्ता ते पक्षप्रमखु असा त्यांच्या कार्याचा आलेख म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाची निशाणीच. त्यांच्या जीवनातील प्रत्येक यशास कष्टाची अट असते.

 सन १९६०-७० च्या दशकात मी पोरगेलासा होतो.कोल्हापूरच्या शिवाजी, मंगळवार पेठेतच माझा वावर होता. या काळात त्र्यं. सी. कारखानीस, दाजिबा देसाई, यांच्या निवडणुका मी पाहिल्या आहेत.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१०३