या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
व्हावा यासाठी आम्ही का भांडतोय, हे लोकांना कळेना. पण ही कामं महत्त्वाची आहेत. तालुक्यात कुठेही बसस्टॉपची शेड दिसत नाही. ज्या वयात सोबत असणं मुलींनाही गरजेचं वाटतं, त्या वयात त्यांना केवळ समस्यांनाच सामोरं जावं लागलं, तर त्यांचंही पाऊल घसरू शकतं. त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. वातावरण असुरक्षित होऊन जातं. सकस वातावरण निर्माणच होत नाही. म्हणूनच मूळच्या धाडसी आणि रोखठोक असलेल्या या मुली सक्षम व्हाव्यात म्हणून जे जमेल ते आम्ही करू लागलो.
७४