पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/38

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेलागायच्या. बैठका आणि कामकाजाचे फोटो आणि व्हिडिओ असं डॉक्युमेन्टेशन सुरू केलं. गर्भवतींना गर्भलिंगनिदानासाठीच्या सोनोग्राफीपासून परावृत्त करायचं, हे एकमेव टार्गेट. बीड आणि परळीमध्ये आघातानं फिरलेलं चक्र आता बरोबर विरुद्ध टोकापासून; पण योग्य दिशेनं गतिमान होत होतं. प्रबोधन, प्रशिक्षणाच्या मार्गावरून धावू लागलं होतं. नवी नाती जोडली जात होती.

कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf
३४