पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/21

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


आणि २०१२ मधल्या काही घटना माध्यमांसाठी मुख्य विषय ठरल्या होत्या आणि घराघरात पोहोचल्याही होत्या.

 आज जेव्हा या कारवाईबाबत विचार करते, तेव्हा मला फक्त तो धक्कादायक बोर्ड आठवतो. कारवाई झाली, त्या दिवशी डॉ. मुंडे यांनी हॉस्पिटलच्या बाहेर लावलेला. कायद्याच्या राज्यात असा बोर्ड लिहिलाच कसा जाऊ शकतो, हे कोडं अजूनही उलगडलेलं नाही. बोर्डवर लिहिलं होतं - 'आज हॉस्पिटल बंद राहील. छापा पडणार आहे.'


कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf
१७