पान:केल्याने होत आहे रे (Kelyane Hot Ahe Re).pdf/८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रयत्न चालूच होते. ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या माध्यमातून हे कौशल्य आत्मसात झाले तर वाढत्या वयात नक्कीच जोमाने विकास होईल हे त्यामागचे तत्त्व. खाद्यपदार्थांची विक्री या माध्यमातून काही वर्षे केली. प्रबोधिनीने कपॅसिटर्स बनवण्याचा व्यवसायही केला. सध्या उद्वाहक (लिफ्ट) बनवणे व त्याचे दुरुस्तीचे कंत्राट घेणे असा व्यवसाय १९८६ पासून चालू आहे. या उत्पादनाला व्यापक बाजारपेठ मिळवण्याच्या दृष्टीने दिल्ली, अहमदाबाद, बंगलोर इथे कार्यालये सुरू केली होती. या व्यापार उद्योग विभागातून त्या त्या शहरांमध्ये विक्रीची व्यवस्था करण्यात आली. प्रशालेतील विद्यार्थी-विद्यार्थिनीना विद्यार्थी दशेतच विक्रि कौशल्य जोपासनेवर भर दिला गेला. शालेय वयापासून हे कौशल्य आत्मसात झाले तर वाढत्या वया नक्कीच जोमाने विकास होईल हे त्यामागचे तत्व. महिलासाठी तांत्रिक प्रशिक्षण व त्यातून उद्योजकता यावर अलिकडच्या काळात भर देण्यात आला आहे.

 प्रयत्नांचे फलित -

 जवळ जवळ ३० वर्ष केलेल्या उद्योजकतेच्या डोळस प्रयत्नांचं दृश्य, फलित आता पहायला मिळत आहे. प्रामुख्याने शिवापूर ते वेल्हा या पट्यातील गावांमध्ये हा बदल जाणवणारा आहे. गाव म्हणजे शेती आणि शेती संबंधित पूरक उद्योग, तांत्रिक ज्ञानाचा अभाव, समीकरण बदलली आहेत. १९७१ च्या आधी या भागात एकही कारखाना नव्हता पण आता सुमारे ४०० लहान- मोठे उद्योग या टापूत उभे आहेत. या उद्योजकांमध्ये तरुण आणि स्त्रियांचा सहभाग मोठा आहे.

 एवढ्या प्रमाणावर उद्योग याचाच अर्थ उद्योगाचं वातावरण इथे तयार झालं आहे. उद्योग म्हणजे मालाची पारख, दर्जाची खात्री, वेळेवर माल तयार होणे, बाजारपेठेची नाडी ओळखणे, कामगारांचे व्यवस्थापन, पैशांचे हिशोब, कामातलं सातत्य आणि नावीन्यही. या सगळ्यांची रुजवण गेल्या ३० वर्षांत इथे झाली आहे. तांत्रिक सक्षमता आणि कौशल्ययुक्त मनुष्यबळ याच खेड्यामधून निर्माण झालं आहे. त्यामुळेच नवीन तरुण पिढी केवळ नोकरीच्या आशेवर जगत नाही तर उद्योगातली धडाडी दाखवण्याची जिद्द त्यांच्यात तयार झालेली दिसते. २०-२५ वर्षांचे हे तरुण स्वत:च्या जबाबदारीवर यंत्र खरेदी करतात. माल खरेदी करतात आणि उद्योगाला सुरुवात करतात. अपयश आलं तरी अपयश हाही उद्योगाचाच उद्योगाचाच एक भाग आहे हे समजून पुन्हा नव्या उमेदीनं व्यवसायाला सुरुवात करतात.

 हेच तरुण उद्योजक उद्योजकांची पुढची पिढीही घडवत असतात. नवीन मुलांना तेच काम शिकवतात व आपल्या इथे कामही देतात. यातून गावातच नोकरीच्या संधी वाढतात. गावातला तरुण गावातच रहातो आणि निसर्गाच्या लहरींवर अवलंबून न रहाता स्वत:च्या पायावर उभा रहातो. या

शिक्षण + तंत्रज्ञान + उद्योजकता - समद्ध अर्थव्यवस्था.