पान:केल्याने होत आहे रे (Kelyane Hot Ahe Re).pdf/७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गावात सुरू झालं. स्वत: मा. शंतनुराव किर्लोस्कर त्याच्या उद्घाटनाला उपस्थित होते. त्यांनी ५० यंत्रे या केंद्राला देऊ केली आणि कामही दिलं. उद्योगला कोटिभास्कर स्मृति उद्योग अर्थात किर्लोस्कर ज्ञान प्रबोधिनी तत्रंशाळा असं नाव देण्यात आलं. १९७२ मध्ये पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर Unicef संस्थेमार्फत हातपंप तयार करण्याची मागणी आली. सुमारे १०-१५ हजार हातपंपांची यावेळी निर्मिती या उद्योगातून झाली. आणि मग मागणीप्रमाणे योग्य ते डिझाईन करणे, १२००तरुणाना या उद्योगात प्रशिक्षण देण्यात आले. त्यावर संशोधन करणे व मोठ्या असे अनेक प्रकल्प इथे हाताळले गेले. साधारणत: २०० कामगार या ठिकाणी काम करत होते.

 कालांतराने या कारखान्यातून 'यंत्रविस्तार योजना' ही कल्पना मूळ धरू लागली. या एका कारखान्यात काम देऊन सगळ्या भागाचा विकास होऊ शकत नाही. हे काम वाढण्यासाठी यंत्रविस्तार योजना १९७५ मध्ये सुरू केली गेली. या योजनेमुळे या भागात उद्योजक वाढावेत अशी कल्पना राबवण्यात आली. या प्रदेशातील तरुणांनी स्वत:चा उद्योग चालू करावा यासाठी त्यांना आवश्यक ती मदत या योजनेमुळे केली गेली. ३० ते ४० तरुणांना यात प्रत्यक्ष यंत्रे दिली. काहीना यंत्रासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. व्यवस्थापनाचं प्रशिक्षण दिलं, कामेही पुरविण्यात आली. असं सर्वांगपरिपूर्ण सहाय्य गावातल्या तरुणांना प्रथमच मिळत असेल. १९८१ मध्ये प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. यातूनही आजपर्यंत सुमारे ४० उद्योगांना सुरुवात झाली. या प्रकल्पामधून सर्व आर्थिक स्तरांतील शेतकरी, नवशिक्षित तरुण, हरिजन, वाजंत्री वादक, मुस्लीम समाज अशा वेगवेगळ्या थरातून उद्योजक तयार झाले आणि स्वत:च्या पायावर उभे राहू शकले.

 बाजारपेठेशी सांधेजोड -

 या एका कारखान्याशिवायही ग्रामीण भागातल्या इतर उद्योगांना चालना मिळावी यासाठीही अनेक प्रकल्प राबवले गेले. यात प्रामुख्याने शिवगंगा खोऱ्यातल्या शेतकऱ्यांना पुण्यासारख्या जवळच्या बाजारपेठेत माल आणता यावा, विकता यावा यासाठी योजना तयार करण्यात आल्या. व्यावसायिक शेतीसाठी तांदूळ विक्री व दूध विक्री या महत्त्वाच्या बाजारपेठेशी ओळख अशा सगळ्याच बाबींचा समावेश होता.

 १९७८ साली पुणे जिल्ह्यातील दुर्गम वेल्हे तालुक्यातील करंजावणे येथे शिवभूमी खांडसरी उद्योग उभारणीचाही प्रबोधिनीने बदललेल्या शासकीय धोरणांमुळे राज्यातील अनेक खांडसऱ्या प्रमाणे हाही उद्योग स्थगित करावा लागला.

 प्रयत्न करुन पाहिला.

 शहरामध्ये उद्योजकता-

 ग्रामीण भागामध्ये हे प्रयत्न चालू असतानाच शहरी विद्यार्थ्यांमध्ये उद्योजक तयार करण्याच्या दृष्टीने

केल्याने होत आहे रे...आधि केलेचि पाहिजे