पान:केल्याने होत आहे रे (Kelyane Hot Ahe Re).pdf/१४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


 आगळीवेगळी कलात्मक वाट   
 नाव - तानाजी नागू आरुडे .
 राहणार - नसरापूर, ता. भोर, जि. पुणे.
 शिक्षण - १२वी (वाणिज्य)
 व्यवसाय - बांबूच्या वस्तू
 उद्योगाचे नाव : आकार बांबू हस्तकला उद्योग
 शिबिर आयोजन आणि इतर मदत
 बांबूपासून वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचं एक शिबिर ज्ञान प्रबोधिनीतर्फे वेल्ह्यात आयोजित करण्यात आलं होतं. शिबिरात तानाजी या बांबूच्या वस्तू बनवायला शिकले. बांबूच्या वस्तू म्हणजे सुपं, टोपल्या हे माहीत होतं. पण त्यापेक्षा वेगळ्या सुंदर व शोभिवंत वस्तू बांबूपासून बनवता येतात त्यातून चांगलं उत्पन्नही, मिळतं आणि हे बुरुडाच्या कामापेक्षा वेगळं असतं याची कल्पना नव्हती. अशा अनेक वस्तू प्रशिक्षणात योजलेल्या. तीच या कामाची सुरुवात म्हणता येईल. प्रबोधिनीकडून २,०००/- रुपये भांडवल घेऊन त्याने काम सुरू केले. याशिवाय नवीन वस्तूंच्या कल्पना, त्यासाठी नवी डिझाइन यासाठीही संस्थेतून मार्गदर्शन मिळालं. काही कामांची ऑर्डरही दिली. काही मालासाठी नवीन ओळखी संस्थेमुळे झाल्या. तर ग्रिटिंगसारख्या वस्तूंची विक्री योजनाही संस्थेने उपलब्ध करून दिली. या पाठबळामुळे आरुडेंचा जो मुळात छंद होता त्याचं उद्योगात रूपांतर होऊ शकलं.
 वस्तूंचं वैविध्य -
 या पार्श्वभूमीवर तानाजीनी अनेक वस्तू तयार केल्या. बाबूंची ग्रिटिंग कार्ड, दिव्यासाठी शेड, कप ठेवण्यासाठी कोस्टर, कप होल्डर, अॅॅश ट्रे, घड्याळाची केस, पेन ठेवण्यासाठी स्टँँड. नवीन वस्तू म्हणून बांबूचं कॅलेंडरही तयार केलं, आणि आता वस्तूच्या मागणीप्रमाणे स्वत: डिझाइन बसवून वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या जातात.
 प्रक्रिया करताना -

 बांबूच्या बहुतेक वस्तू या मूळच्या नैसर्गिक रंगातच केल्या जातात. पण तानाजीनी त्यावरची प्रक्रिया

उद्योगाचा विचार कृतीशिवाय निरर्थक असतो.    ११