पान:केल्याने होत आहे रे (Kelyane Hot Ahe Re).pdf/११

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 प्रबोधिनीच्या कोटिभास्कर उद्योगातील संपर्कमुळे आजूबाजूची कामे अजून मिळतात. त्यापेक्षा फारसं इतरत्र कामं शोधत जावं लागत नाही. लक्ष्मणरावांचे कोटिभास्कर उद्योग समूहाशी असलेले संबंध केवळ मालक- नोकर असे नव्हते. म्हणूनच विश्वासाच्या बळावर उद्योग चालतो. हा विश्वास विद्यार्थी, मग कामगार आणि आता प्रबोधिनीचा सहव्यावसायी या नात्यानी सतत टिकून आहे.


व्यावसायिक हिशोब - खतावणी -


 व्यक्साय यशस्वी होण्यासाठी जमा-खर्चाची योग्य नोंद आणि त्या योगे पैशाच्या उलाढालीवर निर्बंध असणं. गरजेचं असतं ही नस कोंड्यानी बरोबर पकडली आहे. खरंतर कॉलेजात जाऊन त्यांनी जमा-खर्च ठेवण्याचं शास्त्र अभ्यासलं नाही. पण स्वत:च्या अनुभवाच्या बळावर त्यांनी स्वतःची हिशोब मांडण्याची एक पद्धत शोधली आहे. त्यानुसार अतिशय शास्त्रीय पद्धतीनं ते आपली खातेवही ठेवतात. त्यांची हिशोबाची पद्धत आणि वही निश्चिततच आवर्जून पाहायला हवी अशी आहे.

***


 

दूर दृष्टीने संकटावर मात   नाव - शांताराम हरी घारे
 रहाणार - शिवापूर, ता. हवेली, जि. पुणे.
 शिक्षण - आय. टी. आय.
 व्यवसाय -मेकॅनिकल वर्कशॉप
 व्यवसायाचे नाव -घारे इंजिनियरिंग.
 गावातून शहराकडे -

 कऱ्हाड इथल्या घारेवाडीतून १० वी पास होऊन तिथेच आय. टी. आय. चा कोर्स केलेला हा लहान मुलगा शिवापूरला आला. तो आपला स्वत:चा उद्योग सुरू करायचा हे स्वप्न मनात बाळगून. अशिक्षित शेतकऱ्याच्या घरातून आलेले घारे ७०-७१ साली शिकाऊ उमेदवार म्हणून कामाला लागले. ५५ रुपये पगारावर नोकरीचा ओनामा परिचय प्रबोधिनीचे संचालक आप्पा, कार्यवाह अण्णा यांच्याशी झाला. त्यांच्या सहवासातून विश्वास, प्रेम, आत्मविश्वास आणि कामाचा आवाका वाढला. विविध पैलूंवर चर्चा घडल्या. यातून घारे यांचा उद्योगाशी

यश साहसी माणसावर कृपा दृष्टी ठेवते