Jump to content

पान:किर्लोस्कर संगीत मंडळी.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

________________

१२ रामा बाळनाथ बेडगकर. हे ११ वर्षे किर्लोस्कर मंडळींत असून नायिका व उपनायिकेच्या भूमिका करीत असतात. यांचा आवाज संगिताला योग्य असा आहे. नारायण श्रीपाद राजहंस -यांचें गाणें शास्त्रोक्त व मोहक असून सौंदर्य व कंठमाधुर्यामुळें यांना बालपणापासून 'बालगंधर्व' असें म्हणतात. यांच्या सौभद्र, मूकनायक इत्यादि नाटकांतील नायि- केच्या भूमिका वाखाणण्यासारख्या होतात.