पान:काश्मीर वर्णन.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२)

याचा ते हंसदुग्धन्यायाने, स्वीकार करतील अशी आशा आहे. हा ग्रंथ तयार करण्याच्या कामी आह्मीं जे ग्रंथ वाचिले त्यांत डा० डब्ल्यु. हंटर, जे. कोलेट व डा० जे. डयूक यांच्या ग्रंथांचा आह्मांस फार उपयोग जाहला, करितां यांचे व आमचे स्नेही वे० शा० सं० रा० रा० विष्णु शास्त्री देवधर यांनी सर्व राजतरंगिणी ग्रंथ आह्मांस समजून सांगितला, याजकरितां त्यांचे व वे० शा० सं० रा० रा ० वामन शास्त्री पंडित इस्लामपुरकर यांनी ऐतिहासिक भाग सुधारण्याच्या काम योग्य सूचना दिल्या त्याजकरितां त्यांचेही आह्मी फार आभारी आहों. आतां एक गोष्ट सांगून हा प्रस्तावनालेख पुरा करितो. या पुस्तकास एक लहानसा नकाशा जोडावा असा आमचा विचार होता. पण तसे केले असतां खर्च विशेष येऊन पुस्तकाची किंमत जादा ठेवावी लागणार व ती अधिक ठेविली असतां आश्रयदात्यांची संख्या कमी होणार, असे पाहून तो बेत आह्मीं रहित केला.
मिरज,
ता. १ नवंबर १८९९.

रा. भि. गोखले,

                             ग्रंथकर्ता.