पान:काश्मीर वर्णन.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३६ )

आहे. या पर्वतांत खोल व लांब दरे आणि खिडी अनेक आहेत. येथील अति खोल दरे स्विट्झर्लंडांतील महान् : दया एवढे आहेत.
  या पर्वतांवर मोठमोठाले ग्ल्यासिअर्स (बर्फाचे डोंगर) आहेत. त्यांतील कित्येकांची लांबी ५०।६ ० मैल आहे. ते कित्येक वर्षांपर्यंत पर्वतांच्या शिखरांवरून खाली घसरत येत असून त्यांच्या गर्भात हत्तीसारखे मोठे डोंगराचे खडपे असतात.. यांच्या जवळून प्रवासी किंवा यात्रेकरू लोक मार्गक्रमण करीत असतां वाद्यांचा किंवा हरिनामाचा मोठा गजर करीत नाहीत, कारण तसे केलें असतां हवा खवळून जाते आणि त्यायोगाने वर सांगितलेल्या बर्फाच्या डोंगरांस गति प्राप्त होऊन ते एकाएक खाली कोसळून येऊ लागतात आणि त्यांच्या तडाक्यांत जे प्राणी सांपडतील त्यांचा चुराडा होऊन जातो. जहांगीर बादशहाची स्वारी पिरपंजाल नांवाच्या पर्वतावरून एक वेळ जात असतां, त्याने करणा व झांज ही वाद्ये वाजविण्यास बुध्या हुकूम केला. तेव्हां बर्फाचा एक डोंगर त्याजवर येऊन कोसळण्याचा प्रसंग आला होता, परंतु त्यांतून तो मोठ्या मुशकिलीने बचावला, असे प्रसिद्ध फ्रेंच प्रवासी डॉक्टर बर्निअर आपल्या ग्रंथांत लिहितो.
 शंकर (तक्तीसुलिमान) व हरी नांवाच्या दोन लहान टेकड्या श्रीनगराजवळ आहेत. जेलम नदी यांच्या मधून वाहते. या टेकड्याविषयींचे विशेष वर्णन पुढे दिले आहे. येथील पर्वतांची उच्च शिखरें वर्षातून आठ महिने बर्फाने | आच्छादलेली असतात. तत्रापि पूर्वकाली जितकें बर्फ