पान:काश्मीर वर्णन.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २६ )


केली. होडी हेंच हजाचे घर असल्यामुळे त्याच्या प्रपंचास लागणारे सर्व जिन्नस तो होडीच्या तळघरांत सांठवून ठेवितो. आमच्या होडीवर आह्मी तिघे, हांजी, त्याचा झातारा बाप व दोन बहिणी अशी सातजण होतो. काश्मीर प्रांत पुरुषांप्रमाणे बायकाही नावा चालवितात, इतकेच नाही पण त्यांच्याप्रमाणे त्या धष्टपुष्टही असतात. काश्मीरांतील नावाड्यांच्या बायका सुरेख असतात असे कांहीं युरोपियनांनी आपल्या प्रवासवर्णनांत लिहिले आहे. या दोघी बहिणींस पाहून वरील लेखांत पुष्कळ सत्यता आहे असे आह्मांस वाटले. असो. पुढे घड्याळ पाहिले तो सात वाजले, थंडी चमकू लागली. तेव्हां कांहीं उपहार करून ऊर्णावस्त्रांचा व कांग्रीचा आश्रय करून नित्याप्रमाणे कुंभकर्णाचे नामस्मरण आरंभिले. पण आमच्या मनास विकृति झाली असल्यामुळे तो आह्मांस जलदी प्रसन्न होत नसे. असो.
 दुसरे दिवशी पाहाटे हनीने किस्ती हाकारण्याचे काम चालू केले. सकाळचे आठ वाजेपर्यंत थंडी अतिशय असल्यामुळे आह्मांस बिछाना सोडणे इष्ट वाटले नाहीं. येथून श्रीनगरास जातांना बाजूस सोपूर, दबगांव, बांडीपूर, हजन, संबळ, शादीपूर व दुसरी दोन तीन खेडी लागतात. सोपूरजवळ वितस्ता वुलर सरोवरांतून बाहेर पडते. शादीपूराजवळ वितस्तेत एक शिवस्थान आहे. त्याच्याजवळ ललितादित्य राजाच्या मंत्र्याने जलसमाधि घेतली असे राजतरंगिणींत लिहिले आहे. असो. वर सांगितलेल्या गांवांपैकी एक दोन गांवीं मात्र प्रवाशांस लागणारी शिधासामुग्री सरासरी मिळते पण