पान:काश्मीर वर्णन.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २१ )


उरी गांवी जाऊन उतरलो. येथे वितस्तेवर दोऱ्याचा एक पूल आहे. या मार्गावर झाडी अधिक दाट असून थंडीने आपला अम्मल बजाविण्यास आरंभ केला असल्यामुळे अंगावरील कपड्यांचा ऐन दुपारीं सुद्धा आह्मीं अनादर केला नाहीं.

 उरी येथें मुक्काम केला ह्मणून वर सांगितले आहे. पण तेथे आह्मांस जी जागा मिळाली.होती, तिजविषयीं दोन शब्द लिहिल्यावांचून आमच्याने राहवत नाहीं, तत्रापि, या लेखाकरितां आमचे प्रियवाचक आह्मांवर घुस्सा करणार नाहीत अशी अशा करितों. या गांवी रहदारी बंगला असून त्यांत चार वेगळ्या कोठड्या आहेत ह्मणने चार प्रवासी उतरण्यास चांगली सोय आहे. पण आह्मी तेथे गेलों तों दोन कोठड्यांत दोन गौरकाय बाळे येऊन उतरली होती. तिसरीबद्दल तेथील रखवालदार शिपायास विचारता आणखी एक बालक येण्याची वर्दी आली आहे ह्मणून त्याने सांगितले. तेव्हां चवथी उघडून देण्यास विचारितां ती त्या लोकांस खाण्यास बसण्यास पाहिजे. व ती ९| ९॥ च्या पुढें रिकामी होईल ह्मणून त्याने उत्तर दिले; इतकें होईपर्यंत तास रात्र होऊन गेली. थंडी आपला अम्मल चांगला गाजवू . लागली. आह्मी कुडकुडू लागलो होतो, पण वरील उत्तराने आमच्या आंगांत बरीच ग़र्मी उत्पन्न होऊन त्या रखवालदारास चार खरमरीत प्रश्न विचारणार होतों, इतक्यांत विचार मनांत आला की, याच्याशी वाद करणे ह्मणजे त्या गौरकाय लोकांशी भांडण करणे आहे. आपण तर काळे आणि वृद्ध तेव्हां त्या बालकांशी भांडून