पान:काश्मीर वर्णन.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८ )

सुधरू लागले. हे पाहून आह्मी याच गांव रहदारी बंगल्यांत मुक्काम केला. प्रत्येक बंगल्यांत, पलंग, खुर्च्या, मेज, आरसा हे सामान असून महाबळेश्वर येथील बंगल्याप्रमाणे शेकाटीची एक जागा असते. तींत रात्री लांकडे जळत ठेविलीं ह्मणजे थंडीपासून चांगला बचाव होतो. येथे वसति सुमारे ४,८०० आहे. या गांवी लांकडे कापण्याचा एक मोठा कारखाना असून त्यांतील करवतांस प्रेरकशक्ति वाफेच्या यंत्राने मिळते. येथे वितस्ता आणि किसनगंगा यांचा संगम होतो. रहदारी बंगला संगमाच्या नजिक आहे. या स्थली वितस्ता भयंकर आक्रोश करीत असलेली सर्व रात्रभर ऐकू येत होती. गांवच्या नजिक एक जातीची मृत्तिका सांपडते. तिचा येथील लोक कपडे रंगविण्याच्या कामी निळीप्रमाणे उपयोग करतात. येथेही एक सस्पेन्शन् (लोंबता). पूल बांधिला असून त्यावरून पलीकडच्या तिरीं मुजाफर नांवाचे गांव आहे तेथे जातां येते. हा गांव पाहण्यास आह्मी दुस-या दिवशी सकाळी गेलो होतो. या गांवचा बराच भाग अग्निनारायणाने जाळून फस्त केला असून लोक आपआपली घरें व दुकाने पुन्हा बांधण्याच्या कामी निमग्न असलेले दृष्टीस पडले. वर सांगितलेल्या पुलावरून आमचा मार्ग मुळीच जात नाही, तत्राप येथेही आमच्या वाहनाकरितां दस्तुरी ह्मणून एक रुपया द्यावा लागला. त्याच्या कारणाचा तपास करितां हें नेटिव्ह राज्य ह्मणून दस्तुरी दिली पाहिजे असे समजले असो.
 दोमेल गांव भोजन करून अकरा वाजता आह्मीं तें