पान:काश्मीर वर्णन.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१७)

आमच्या पाहण्यांत आलें. वितस्तेच्या दर्शनाचा लाभ होऊन दोन तीन मैल गेल्यावर देवल नांवाचे गांव लागले. हा मार्ग बराच उतरणीचा वाटला. येथून १४ मैलांवर कोहाला नांवाचा गांव लागला. हा गांव वितस्तेच्या दोहों तिरांवर वसला आहे. त्याच्या दोहों भागांस जोडणारा एक सस्पेन्शन (लोंबता) पूल पंजाब सरकाराकडून वीस वर्षांपूर्वी बांधण्यांत आला आहे. तो ओलांडून जाण्यास टांग्यास एक रुपया दस्तुरी द्यावी लागते. पुलाच्या अलिकडील कोहाले गांवचा भाग पंजावांत मोडतो .आणि पलीकडे गेलें कीं, काश्मीर महाराजांच्या राज्यास आरंभ होतो. कोहाला येथे मार्गावर सोनारांची दोन तीन दुकानें लागली. त्यांत अल्प मोलाचे दागिने विकरीस ठेविले होते. त्यांची करणावळ पाहून श्रीनगर येथे असले अलंकार किती उत्तम करीत असतील असे वाटले. येथून कांहीं मैल पुढे गेलो, तेव्हां मार्गात एक दोन ओबडधोबड बोगदे लागले. ते पाहतांच आपण काश्मीरच्या राज्यांत आलों असे प्रवाशांच्या सहज लक्षात येते. कोहालापर्यंत वितस्ता आपल्या उजवीकडे होती. ती पूलं ‘ओलांडल्यावर आपल्या डावीकडून वाहत खाली जाते. येथून मार्ग चढता लागतो. पुढे दुलेई नांवाचे गांव लागले. दिवस तासापेक्षा अधिक आहे असे पाहून टांगा पुढे हाकण्यास सांगितले. तेथून दहा मैलांवर दोमेल गांव आहे ते दिसू लागले. तेव्हां सूर्यास्ताची वेळ जवळ आली हे जसे कार्य सुचविण्याकरितांच पक्षी किलबिल शब्द करून आपल्या घरट्यांचा मार्ग