पान:काश्मीर वर्णन.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १० )

हून मरीपर्यंतः ८ रुपये व मरीपासून बरामुलापर्यंत २७ रुपये घेऊन टपालाचे टांग्यांतून नेतात. यापुढे घोड्यावरून किंवा नावेत बसून श्रीनगरास गेले पाहिजे. पायवाटेने गेल्यास वाटेंत पाटन येथे मुक्काम करून दुसरे दिवशीं श्रीनगरास जाता येते. घोड्यास. भाडे दररोज बारा आणे पासून एक रुपया पडते. मध्यम प्रतीची नाव दररोज आठ दहा आणे भाड्याने मिळते. तीतून तीन चार मनुष्यें सुखाने जाऊ शकतात. एकाच मनुष्यास जाण्याचे असल्यास त्यास दीड दोन रुपये घेतात. रावळपिंडीहून मरीपर्यंत ३७ मैलांत बाराकाऊ, ट्रेट व दुसरी दोन तीन खेडी लागतात. पंरत येतेवेळी मात्र आह्मीं ट्रेट येथे रहदारी बंगल्यांत उतरलों होतो. मरीहून बरामुलापर्यंत १२८ मैलांतील मुक्काम करण्याची गांवे, व त्यांनमधील अंतरें खाली दिल्याप्रमाणे आहेतः-

मैल

मैल

१ मरीहून देवल १३

६ गडी-हट्टी ११

२ देवल-कोहाला १४

७ हट्टी-चागोटी १४

३ कोहाला-दुलेई १२

८ चागोंटी-उरी १६

४ दुलई–दोमेल १०

९ उरी-रमिपूर १३

५ दोमेल-गडी १३

१०रामपूर-बरा मुला १२

या सर्व गांवी प्रवाशांस लागणारी सामुग्री मिळते, व उतरण्यास रहदारी बंगले असून त्यांत चोवीस . तास राहण्यास एक रुपया भाडे व दिवाबत्तीबद्दल दोन आणे द्यावे लागतात. वर सांगितल्यापैकी बहुतेक गांव सडकेपासून जवळ असून वितस्ता नदीच्या अगदी कांठावर आहेत;