पान:काश्मीर वर्णन.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८)

आहे. यांत यवन व हिंदु यांचा मुख्य भरणा आहे. वर सांगितलेल्या भागांत गेल्या खानेसुनारीप्रमाणे कोणत्या जातीचे किती लोक राहतात याचे पत्रक या ग्रंथाचे शेवटी जोडले आहे. त्या पत्रकावरून असे दिसून येईल की, यवनधर्मी लोक या राज्यांत दर शेकडा ७०.९, हिंदु २७.७, बौद्ध १.२ व इतर ६ आहेत. हिंदूत पंडित, सीक, रजपूत व जैन यांचा समावेश होतो. पंडित लोक आपणांस ब्राह्मण ह्मणवितात. यांत कांहीं पोटभेद असल्याचे समजते. यांची संख्या पन्नास साठ हजारांहून अधिक नाहीं. ते मुख्यत्वे श्रीनगर येथे व दुस-या मोठ्या गांवीं. राहतात. बौद्ध लोकांचा विशेष भरणा लदाकं प्रांती आहे. जैन जसू प्रांत मात्र आहेत. अनिर्दिष्ट सदराखालीं गिलजित् प्रांतांतील दाखविलेले लोक बहुतेक यवन आहेत, असे खानेसुमारीचे. पत्रकांत लिहिले आहे. या राज्यांत काश्मीर, चित्रल, यासीन,याजिस्तान,गिलजितू,बालतिस्तान्,लदाक, भुदरवा,जम्मू, नौशीरा, पुंच व अस्तार हे मुख्य प्रांत आहेत. त्यांविषयी थोडीशी माहितीपुढे. दिली आहे. या राज्यांतील निरनिराळ्या भागांत स्त्रीपुरुषाचे प्रमाणआपल्या देशापेक्षां बरेंच भिन्न आहे, करितां त्याचेही एक पत्रक शेवटीं जोड़लें आहे. त्यावरून असे सिद्ध होते की, या राज्यांतील सर्व धर्माच्या लोकांत स्त्रियांची संख्या कमी आहे. लंदाक प्रांतांत बहुपति करण्याची चाल आहे, ती याचमुळे पडली असावी असे वाटते.

या देशांत जाण्याचे मार्ग.

 या देशांत जाण्याचे मुख्य मार्ग-पांच आहेत. पण