पान:काश्मीर वर्णन.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ७ )

व येथील स्थळांच्या मोहक शक्तीची साक्ष, तिच्या सूचनेवरून बादशाहाने केलेले रमणीय बगीचे व दुसन्या. मजेदार इमारती देतात. या देशांतील हवापाण्याचा उपभोग घेण्यास व तेथील सृष्टिसौंदर्य पाहण्यास आपल्या देशांतून दरसाल शेकडों साहेब लोक जातात. इतकेच नव्हे तर युरोप व अमेरिका या खंडांतून सुद्धा कांहीं प्रवासी या भूस्वर्गाचा लाभ मिळावा ह्मणून येतात. पंजाबतील पुढारी लोकांत ज्याने या भूस्वर्गाचा दर्शनलाभ घेतलेला नाही असा पुरुष क्वचितच सांपडेल.

काश्मीर राज्याचा विस्तार

 काश्मीर प्रांत हा हिमाचलांतील एक मोठा दरा आहे. तो आपल्या देशाच्या उत्तरेसं वायव्य बाजूस आहे. मुख्य दुऱ्याची .लांबी : १२० व रुंदी ६९ मैल आहे. येथे पूर्वकालीं एक मोठे सरोवर होते. त्यांतील पाणी कश्यप ऋषीने बाहेर काढून दिले आणि हा दरा बनविला. त्यावरून त्यास काश्मीर असें नांव पडले. ती कंथा पुढे देऊ. तसेच या दुऱ्याच्या सभोंवती पर्वतांच्या रांगा असून त्यांत दुसरे दरे, खिंडी व घांट आहेत. त्यांतील कांहींचे वर्णन पुढे दिले आहे. काश्मीर राज्याचा विस्तार उत्तर, पूर्व आणि दक्षिण दिशांकडे पुष्कळ वाढला आहे. या सर्व राज्याची पूर्वपश्चिम लांबी . सुमारे ३५० व दक्षिणोत्तर रुंदी २.७० मैल आहे. त्याचे क्षेत्रफळ अजमासे २०,९०० चौरस मैल आहे. यांत काश्मीर, जम्मू, लदाक, स्कार्डू व गिलजित् हे मुख्य भाग आहेत. यांतील लोकसंख्या २५,४३,९५२