पान:काश्मीर वर्णन.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५)

भल्लट, अभिनवगुप्त, विल्हण, कल्हण; शंभु, मंख, रामानंद, सौरात, कर्पूरथट्ट, रूपभट्ट, योद्धभट्ट, जोनराज, श्रीवर हे व दुसरे शेकडों पंडित काश्मिरी असून ते आपणांस तद्देशीय ह्मणवून घेण्यांत मोठा गर्व मानीत. याच देशांत क्षेमेंद्र नांवाचा एक जाडा पंडित, होऊन गेला. त्याने सर्व विषयांवर शेंकडों ग्रंथ लिहिले आहेत. कविश्रेष्ठ जो कालिदास तोही काश्मीरांत किंवा त्याच्या लगतच्या प्रदेशांत जन्मलेला असावा असे अनुमान होते. ते पुढे इतिहासंभागांत दर्शविले आहे. या सर्व गोष्टींवरून काश्मीर देश संस्कृत विद्येचे माहेरघर होते असे झटले असतां शोभेल. काश्मीरांतील लोकांच्या सौंदर्यास जसे तेथील हवापाणी हे मुख्य कारण आहे, तसेच तेथील कवींच्या अलौकिक कल्पनाशक्तीस व बुद्धीस. तेथील निसर्गाच्या (सृष्टिरचनेच्या ) नानाविधलीला हे मुख्य कारण असावे असे वाटते. असो, वर सांगितलेले व दुसरे पंडित, त्यांनी लिहिलेले. अनेक ग्रंथ, त्यांविषयीं ऐतिहासिक कथा व आख्यायिका यांची जेवढी माहिती मिळाली तेवढी पुढे योग्य स्थळी दिली आहे.
 बरें, आतां कलाकौशल्याच्या संबंधाने आपण थोडासा विचार करूं. या देशीं प्राचीनकालीं बांधिलेल्या इमारतींचे जे अवशिष्ट भाग दृष्टीस पडतात, त्यांवरून व तेथें सांपडणाच्या जुन्या नाण्यांवरून शिल्पशास्त्र किती उच्च दशेस पोहोचले होते, याची सहज कल्पना करिता येते. तसेच सर्व वस्त्रांत महावस्त्र जी शाल ती विणण्यांच्या अपूर्व कलेकरितां या देशाचे नांव हजारों वर्षा-