Jump to content

पान:काव्यदोष विवेचन.pdf/294

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असतां पत्र न पाठविलें ह्मणोन लिहिले. ऐसियासी राजश्री राजे जीवनरावजी प्रतिदिवसीचें वर्तमान लिहितात याजकरितां पत्र लिहिण्यास अंतर जालें. माफ केले पाहिजे. इकडील वर्तमान तर याजपूर्वी आपण राजश्री बाबूरावजीस लिहिले होते की तूर्त दोन चार रोज राजश्री राजे जीवनराव यांसी तिकडे येणे मसलहत नाही. हे वर्तमान आपल्या श्रवणाभिरूढ व्हावें ह्मणोनच त्यांस लिहिले होते. सारांश, आपणांस श्रवण जालेंच असेल. सांप्रत राजे म॥रनिले यांनी जाबसालाचे गुंते कुल उगविले. काही संदेह राहिला नाही. उदईक राजे म॥रनिले व हकीम महमदअल्लीखान आपले सेवेसी येतात. विस्तरें वर्तमान निवेदितील. व घरचा पेंच उगवावयासाठी निजामुद्दौला बहादर यांजकडून दोघे भले माणूस नवाब बसालतजंग यांजकडे आले होते ते व इकडूनहि सोफीबेगखान वगैरे तिघेजण भले माणूस ऐसे तिकडे गेले. पुढे यांचा त्यांचा भेटीचा सिद्धांत होईल तो लिहिजेल. हे विनंति. [ ९२] ॥श्री॥ २८ सप्टेंबर १७५७. पे॥ छ १३ मोहरम बुधवार त्रितीयप्रहरदिवस. श्रीमंत राजश्री राउसाहेब स्वामीचे सेवेसीः आज्ञाधारक गणेशसंभाजी सा॥ नमस्कार विज्ञापना. ता॥ छ १२ मोहरम संध्याकाळ ......... घटिका दिवस पावेतों सुखरूप असे. विज्ञापना ऐसीजेः निजामअल्लीखान यांणी अकरा कोसांची मजल करून दाभाडीवर मुकाम केला होता. आज पहाटे प्रहररात्रीं कुच करून आजी अकरा कोस वरूडनजीक शहर तेथून पांच कोश आहे तेथे गेले. उदईक दाखल कदाचित् होतील. तेरावी तेरीख आहे. बहुधा चौदाव्ये तेरखेस पोहचतील. बहुत काय लिहूं. हे विज्ञापना. या प्रांतीचे वर्तमान होईल तें वरच्यावर २२