________________
१०५ शंकराचे कारभारी यांजपासून साधेल रुपया वगैरे ऐवज तो घ्यावा. कारभारी याणींच चोरी करून रुपये खादले. मागें कागदावर सरकारच्या मोहर संदुखावर करून ठेवल्या असतां ते यांणी फाडून कागद नेले. तस्मात् पुर्ते लबाड ठहरले. यास्तव यांची जप्ती करून साधेल तें साधावें व घोडी वगैरे जप्त करावी. घोडियांपैकी दोनशे घोडी तेथे ठेवणे व बाकी हुजूर पाठविणे." ह्मणोन आज्ञा. ऐशियांसी, आह्मीं नर्मदेचे *तळावरूनच जप्तीस पाठविले. गोपाळ केशवास हुजूर आणिलें. लबाडहि असतीलसे वाटते. यास काढिलें तेव्हां थोडीशी लबाडी केलीच. अद्यापिहि रयतीमध्ये फितूर आहे. परंतु, आह्मी येथे आणून थोडेसें तडकाविलें. आतां मामला जप्त करून मामलत चालीस लाविली व यांचेंहि घर जप्त करावयास ताकीद केली. याज॥ याजपाशी काय हाती लागेल ? घोडी वगैरे फारकरून लक्ष्मण शंकराचा लवाजिमा नारो शंकर याजपाशी आहे. ते हुजूर आलियावरी त्यांचीहि जप्ती करितों. प्रतापसहा व विसाजीपंत स्वामींकडून आले त्यांसहि ओडसयास रवाना केले आहे. स्वामींस कळावें. र॥ छ २१ जमादिलाखर. बहुत काय लिहिणे. हे विज्ञापना. पे॥छ १३ साबान. [६० ] ॥ श्री॥ ता. १३ मार्च १७५७. अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्यराजश्री बाळाजी गोविंद गोसावी यांसीः सेवक रघुनाथ बाजीराऊः नमस्कार. सु॥ सबा खमसैन मय्या व अल्लफ. चिरंजीव सगुणाबाई महायात्रेस गेली आहेत. त्यांचे खर्चाची नेमणूक
- हांडियावरून. १२८ बाजीराव बल्लाळाचे सगळ्यांत धाकटे पुत्र जनार्दनबाबा-यांची स्त्री. जनार्दनबाबा इ. स. १७४६ त वारले.
१४