आजारी ऑफिस 'साहेब चहाला गेले आहेत' हे उत्तर त्या ऑफिसमध्ये केव्हाही फोन केला तरी मिळतंच. अगदी केव्हाही. त्या साहेबाला कुठली तरी चहाची कंपनी केव्हा तरी 'चहारत्न' वगैरे सारखा पुरस्कार नक्की देणार याची मला खात्री आहे. दहा-बारा जणांचंच ते ऑफिस आहे, पण ते सारं ऑफिसच पेंग घेतंय किंवा चहाला गेलंय असंच कायम वाटतं. क्रिकेटच्या हंगामात स्कोअरची विचारणा, निवडणुका चालू असतील तर राजकारण किंवा कधी लोकलचं वेळापत्रक, भाज्यांचे चढ़े भाव आणि कुठल्या दुकानात अनारसे चांगले मिळतात याचीही चर्चा असते. सुस्त, आळशी आणि सदा चकाट्या पिटणारं ते ऑफिस म्हणजे अंगावर काटा आणणारीच गोष्ट आहे. असं असण्याची कारणं बरीच आहेत. त्या सर्व टीमला नेमकं उद्दिष्ट नाही, हेतू नाही, त्यांच्या कामाचं मोजमाप नाही, मूल्यांकन नाही. त्या ऑफिसातले सर्व जण गप्पा मारण्याच्या तहानेनं व्याकूळ आहेत, नव्हे ती त्यांची मानसिक गरज आहे. कुणाशी तरी बोलण्याची अन मन मोकळं करण्याची संधी त्यांना ऑफिस सोडून दुसरीकडे मिळत नाही. त्यात दोन-चार कामाची चांगली इच्छा असणारे आहेतही; पण बाकी साऱ्यांपुढे त्यांचं काही चालत नाही. त्या ऑफिसचं काही खरं नाही, ते आजारी आहे, सर्व क्रियाशील शक्ती गिळण्याची ताकद त्यामध्ये आहे. कार्यसंस्कृती ८८
पान:कार्यसंस्कृती.pdf/८९
Appearance