गृहकृत्य माधुरी रोजच्या घरच्या जबाबदाऱ्यांनी कंटाळली आहे. मुलं, नातेवाईक, नवरा यांचं करता करता तिला मिळेल तेव्हा स्वतःसाठी वेळ मिळतो; पण निश्चित मिळतो असं मात्र नाही. 'अनुत्पादक श्रम, बिनपगारी काम, पूर्ण वेळ गृहकृत्यदक्ष' अशा पद्धतीनं वतःच्या कामाकडे ती बघते. मी तिला कसं समजवावं याचा विचार करतो. जाणीवपूर्वक मुलांना वाढविणं, त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देणं, घरात काही कामं स्वतःच करणं याला समाजात काही विशेष स्थान नाही. सर्व कामं पैसे टाकून करून घेता येतात असं मानणारा बराच मोठा वर्ग आहे. माधुरी ठराविक वेळ घरच्यांसाठी बँक, फोन बिल, वीज बिल भरणं अशी कामं करत असते. घरच्या सर्वांचं स्वास्थ्य जपते. म्हणून तरी तिला गृहिणीपदाकडेही डोळसपणे पाहता यावं असं वाटतं. गृहिणी सध्या नियोजन, व्यवस्थापन, मेंटेनन्स, सहकारी अशा सर्वच पदांचा भार सांभाळत नाही काय? तेही रजा न घेता. हे श्रम अनुत्पादक कसे म्हणणार ? निर्धास्तपणे घराबाहेर पडणाऱ्या सहचरांनी मात्र या गृहिणींना 'तुमच्याशिवाय हे सगळं कोण सांभाळणार' असं म्हणावं हे उत्तर मला सुचलंय. गृहकृत्य सांभाळणं सोपं नाही. ७३ कार्यसंस्कृती
पान:कार्यसंस्कृती.pdf/७४
Appearance