विश्वास कुठंही, कुठलंही आणि कोणत्याही स्वरूपाचं काम करताना जसं विश्वासाचं अधिष्ठान असेल तर जी बहार येते, त्याला तोड नाही, विश्वास, परस्पर दृढ आणि गाढा विश्वास ही कार्यसंस्कृतीमधली एक अतीव सुंदर गोष्ट आहे. अतीव सुंदर. 'विश्वास' एक ताकद तर आहेच; पण त्याचबरोबर उत्तम दागिना आहे, अलंकार आहे कार्यसंस्कृतीचा विश्वास असेल, एकमेकांविषयी खात्री असेल, एकमेकांचा अंदाज असेल तर काम करताना सदैव आनंद मिळत राहील. मात्र हा विश्वास आपोआप कधीच मिळत नाही. विश्वास संपादन करणं म्हणजे लॉटरी नव्हे. काढलं तिकीट अन् लागली विश्वासाची लॉटरी. विश्वास निर्माण होणं, तो जोपासणं आणि तो वाढवत नेणं ही एक नाजूक, कष्टाची आणि लांब पल्ल्याची गोष्ट आहे. एक प्रक्रिया आहे. मात्र विलक्षण फलदायी आहे. एक सांगतो, आपण काम करतो त्या ठिकाणी एक-दोघांशी जरी आपण घनदाट विश्वासाचं नातं निर्माण करू शकलो, तर त्यातून मिळणार आनंद फार मोठा आहे. तो घ्यायला हवा. कार्यसंस्कृती ६२
पान:कार्यसंस्कृती.pdf/६३
Appearance