Jump to content

पान:कार्यसंस्कृती.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आपला भर कशावर? एक प्रश्न अगदी सनातन आहे आणि तो म्हणजे आपण ज्या गोष्टींसाठी जितकी शक्ती लावायला पाहिजे तितकीच लावतो की त्यात काही कमी-जास्त करतो आहोत? म्हणजे असं की शारीरिक तंदुरुस्तीसाठी आपण हवा तितका वेळ देतो आहोत काय? आणि हवा तितका वेळ देत असलो तरी जो हवा तोच व्यायाम करतो आहोत काय? किंवा आपल्या कामाची योग्य जाहिरात हवी तशी अन् हव्या त्या पद्धतीनं करतो आहोत की नाही? त्यावर लावायचा तेवढा पैसा आणि बुद्धी आपण लावतो आहोत की नाही? कुठे, किती भर द्यायचा हा अगदी कळीचा मुद्दा आहे. आपण एका दिवसाचं उदाहरण घेऊ. आपला बहुसंख्य वेळ साध्या, रोजच्या दिनचर्येच्या गोष्टीत जातो. याला फोन कर, त्याच्याशी गप्पा मार. मग वेळ जातो मोठ्या, तातडीच्या गोष्टी संपवण्यात, पण फार थोडा वेळ 'मी कशावर आणि किती भर दिला पाहिजे?' या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात दिला जातो. वर्षभरातून एक पूर्ण आठवडा आपला भर कशावर हे तपासण्यासाठी जरूर द्यावा. १०९ कार्यसंस्कृती