Jump to content

पान:कार्यसंस्कृती.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दौऱ्यामधील काम श्यामला कामानिमित्त दौरे करायचे असतात. त्याचा प्रत्येक दौरा विमान, सेकंड ए.सी. नं होतो. त्यामुळे कामाच्या ठिकाणी तो अगदी ताजातवाना वाटतो. त्याला एकदा या दौऱ्याबद्दल विचारलं. त्याच्या मते विमानाचा प्रवास हा बऱ्यापैकी वेळखाऊ. म्हणजे प्रवासातला वेळ कमी असला तरी निघण्याआधी आणि नंतरचा वेळ मात्र बराच असतो. या प्रवासात वेळीअवेळी खाणं आणि झोप घ्यावी लागते. त्यामुळे विमानापेक्षा रेल्वेनं प्रवास अत्यंत सुखावह वाटतो. मस्त विश्रांती होते आणि खूप वाचता येतं. श्याम प्रवासाला निघताना कामाचे अनेक कागद बरोबर ठेवत नाही. पण यादी मात्र सोबत ठेवतो. वाचायचं एखादं पुस्तक किंवा लेख हेदेखील लागतंच. टेलिफोनची डायरी तर त्याला अनेकांशी संपर्कात ठेवण्यास मदत करते. यामुळे श्याम दौऱ्यावर असूनही त्याचा वेळ तो अत्यंत विचारपूर्वक वापरत असतो. एकदा तर श्यामनं डिक्टेशनची एक कॅसेट आपल्या सेक्रेटरीसाठी रेकॉर्ड करून दौऱ्याहून परत येताच हातात दिली. अधिक जबाबदार आणि कार्यक्षम राहणाऱ्या श्यामला प्रवासातला वेळही कधीच वाया जात नाही असंच वाटतं. शांतपणे काही नवी कामं होतात आणि विचार तर होतोच. तेही एक काम असतं. - १०१ कार्यसंस्कृती