पान:कार्यशैली.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६६. सतत धडपड



 सात-आठ वर्षांची ती दोघं सायकलशी झटापट करत होती. मी आमच्या गॅलरीत उभा राहून पाहत होतो. एकजण सायकल मागून धरतो आणि दुसरा जोरात पॅडल मारून तोल सावरून सायकल पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे.
 त्यांची ती झटपट विलक्षण मनोहारी होती. कितीतरी वेळा ती पडत होती. पण त्यानं त्यांचा धीर खचत नव्हता की उत्साह मावळत नव्हता. त्यांचे प्रयत्न चालूच होते.
 मला वाटलं मी देखील लहानपणी असाच असणार. धडपडलो तरी पुन्हा उठणार, पुन्हा प्रयत्न करण्यासाठी. मग सध्या काय झालं आहे. पडलो तरी पुन्हा उठून प्रयत्न करण्याची माझी वृत्ती कुठं हरवली आहे? मी चटकन काही होणार नाही, काही बदलणार नाही, अशा निष्कर्षाला का येतो आहे? माझ्यातली ऊर्मी विझली का? माझ्यातले प्रयत्न संपले कार.
 माझ्या काम करण्याच्या आणि जगण्याच्यासुद्धा, पद्धतीत मला सतत बदल करत राहण्याची आवश्यकता आहे. चुकलं, पडलो तरी, धडपडलो तरी, करत राहायची शिस्त मी बाळगायलाच

हवी.

९१ कार्यशैली