पान:कार्यशैली.pdf/८१

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५८. पापाचा उगम छोटी छोटी पापं आपण रोज करत असतो. ती पापं अगदी छोटी असतात पण अगदी रोज, उठता बसता ती आपल्या हातून होत असतात.
 ऑफिसमधल्या कुणाचा उत्कर्ष आपल्याला बघवत नाही म्हणून मग आपण त्याच्याविषयी उगाचच खोटंनाटं बोलत राहतो. खोटं बोलतो. चोरून सिगरेटी ओढतो. रिक्षावाल्यानं चुकून एक रुपया कमी घेतला तर बोलत नाही आणि कारण नसताना मुलांच्या पाठीत धपाटा मारतो.
 अशा छोट्या छोट्या पापांचा मग आपल्याला त्रास होऊ लागतो. ही पापं आपल्याला खायला लागतात.
 खरं म्हणजे पाप ही काही विशुद्ध नैसर्गिक गोष्ट नाही. पाप निर्माण होतं आपलं लक्ष विचलित झाल्यामुळं, आपण आपली जबाबदारी विसरल्यामुळं, आळशीपणामुळं आणि शॉर्टकटनं यश मिळण्याच्या हव्यासापोटी. पाप नैसर्गिक नाही, पुण्य, चांगुलपणा नैसर्गिक आहे, सहज आहे.

 या पापांचा उगमच होणार नाही असं जगलं पाहिजे. पापाचा उद्भव एखाद्या भळभळणाऱ्या जखमेसारखा आहे. ती जखम होणारच नाही असं राहता येईल का आपल्याला ?

कार्यशैली। ८०