३. मूडस्चे वेगळे रंग
विशाखा केव्हा सटकेल काही सांगता येत नाही. सकाळी आपणहून फायली घेऊन कामाचा फडशा पाडणारी विशाखा दुपारी चहा पिताना भेटलो तर तोंड वाकडं करून बसलेली. रोज लिफ्टमध्ये
भेटल्यावर दिलखुलास हसून एखादा विनोद करणारी विशाखा एखादा दिवस बघतच नाही आणि तिनं बघितलं तरी हास्याची एखादी रेषापण तिच्या चेह-यावर उमटत नाही.
मूडस्चे असे बदलते रंग हा विशाखाच्या एकूण प्रगतीतला फार मोठा अडसर आहे. आम्हा सर्वांना तिची काही खात्रीच नाही. केव्हा एखादा आगडोंब उसळून काय होईल याचा कुणाला ठावच लागत नाही. अत्यंत निसरडा मूड आणि त्याची सपशेल अनिश्चितता यानं विशाखा जिथं होती त्याच जागेवर वर्षानुवर्षे आहे.
अर्थात विशाखाला यावर मात करता येईल. स्वतःचा मूड येताना आणि जाताना तिनं नीट जवळून ध्यान देऊन पाहायला हवा. त्याची कारणं शोधायला हवीत. वेळा तपासायला हव्यात. परिस्थितीचा काही परिणाम होतो का हे तपासायला हवं. मूडसच्या वेगवेगळ्या रंगांवर पकड ठेवता यायला हवी.
७। कार्यशैली