Jump to content

पान:कार्यशैली.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५५.साध्या जेवणाची फॅशन



 जेवण झाल्यावर आम्ही सारे जेव्हा पुन्हा खोलीमध्ये आलो, तेव्हा सगळं वातावरण बदललेलं होतं, सगळं. लोकांचा बोलण्यातला रस कमी झालेला होता. सारे पेंगुळलेले होते. डोळ्यावर पेंग होती. उत्साह मावळलेला होता. लोकांचा न बोलण्याकडं, जे चाललंय ते चालू द्या असा मूड होता. झालेलं भरगच्च शाही जेवण सगळ्यांच्या अंगावर आणि बुद्धीवर पसरलेलं होतं, सावट आल्यासारखं.
 वाटलं जेवणानं घोटाळा केला होता. भरपूर स्वीट, आईस्क्रीम असं जेवण एखाद्या कामाच्या मीटिंगमध्ये लोक का देतात, असा प्रश्न माझ्या मनात आला.

 आपण सर्वांनीच असा ठराव करून टाकायला पाहिजे की काम करायचं असेल तर अगदी हलकं, साधं आणि बुद्धी चालू राहील असंच जेवण ठेवावं. लोकांना पर्याय देऊच नये. खूप खर्च करून, शाही खाना ठेवून कामाची वाट लावण्यापेक्षा पोळी, एखादी भाजी, फळं, सॅलड असा योग्य आहार द्यावा. राजस जेवण्याऐवजी कामाचं, कामकल्याचं जेवणच ठेवायचं, अशी फॅशनच आपण सुरू करावी.

कार्यशैली। ७६