पान:कार्यशैली.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 तिसरा गुण म्हणजे भांडण-तंटे, रुसवे-फुगवे सोडविण्याची क्षमता. जो माणूस भांडण-तंट्यात शांत राहू शकतो आणि शांत राहून प्रश्न सोडविण्याची क्षमता ज्याच्यात असते, अशाच माणसाला अनेक लोकांकडून काम करून घेता येतं.

 आज परिस्थिती अशी आहे की, अनेक कामांसाठी आपल्याला अनेकांवर अवलंबून राहावं लागतं, पण त्यांच्याकडून काम करवून घ्यायचं तर हवी माणसं-समजण्याची कला, योग्य शब्दांची निवड करण्याचं कसब आणि भांडण-तंट्यात मार्ग काढू शकण्याची खुबी.

६९। कार्यशैली