Jump to content

पान:कार्यशैली.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४९. काम करून घेण्याची कला



 मागे लागल्याशिवाय कामं होत नाहीत, हा आपल्या सर्वांचाच अनुभव आहे. पण नुसतं वसवसाट करून, हात धुऊन लोकांच्या मागे लागल्यानं कामं होतात हेही खरं नाही.
 खरी गोष्ट आहे की, तुम्हाला लोकांकडून कामं करून घ्यायची असतील, तर तुमच्याकडे तीन विशेष गुण असलेच पाहिजेत. कोण कसा आहे, कसा नाही. कुणाची पावलं संतांची आहेत, तर कुणाची दुर्जनाची! कुणाला कामं आवडतात, कोण कुठं मोकळा असतो, कुठं सहज असतो, याचं अचूक निदान असायला पाहिजे. म्हणजे कुणाकडून काय काम सहजी करून घेता येईल हे समजू शकेल, हा झाला पहिला गुण.

 दुसरा गुण म्हणजे, योग्य शब्दांची योग्य वेळी योग्य माणसांसमोर मांडणी. उदाहरण पाहा,नाः गांधीजींचे शब्द 'चले जाव', केनेडींचं ते प्रसिद्धवाक्य : 'देश तुमच्यासाठी काय करील, हे विचारण्यापेक्षा तुम्ही देशासाठी काय कराल, हे सांगा'. योग्य वेळी योग्य शब्द. माणसांना शब्द हलवतात आणि माणसं मग देश बदलतात. लोकांकडून करवून घ्यायचं असेल, तर योग्य बोलायला शिकायला पाहिजे. तसं येत नसेल, तर तसा बदल करायला पाहिजे.

कार्यशैली।६८