Jump to content

पान:कार्यशैली.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४३.थांबा



 एखादा दिवस असा उजाडतो की वाटतं दूर जंगलात निघून जावं किंवा स्वत:ला जमिनीत गाडून घ्यावं किंवा एकटंच कुणालाही न सांगता डोळे मिटून पडून राहावं, काहीही न करता.
 अशा दिवशी फोनची रिंग वाजली तरी दचकायला होतं, आता आणखी काय बला असं वाटतं. काही म्हणजे काहीही सुचत नाही. काही करावंसं वाटत नाही. तोंडाला चव नसल्यासारखं कामात मन लागत नाही. कुणा म्हणजे कुणालाही भेटावंसं वाटत नाही. उठवत नाही. बोलवत नाही. फोनवर थातुरमातुर उत्तरंही देता येत नाहीत
 असा दिवस एखादे वेळीस उजाडतो तेव्हा जे असेल ते काम जिथं असेल तिथं तिथल्या तिथं ठेवून द्यावं. धोक्याची घंटा वाजती आहे. तुम्हाला ताबडतोब थांबण्याची गरज आहे, असा त्याचा अर्थ आहे.

 अशा वेळेस खेचू नका, ताणू नका, थांबा, काहीही करू नका. तुमच्या मनाला विश्रांती हवी आहे, विराम हवा आहे असं समजा. थांबा, जिथे आहात तिथंच थांबा. शांत राहा-दोन-चार दिवसांसाठी.

५९। कार्यशैली