पान:कार्यशैली.pdf/५४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३८. चहात वापरायचं पाणी


 लुव नावाचा एक प्रख्यात 'टी मास्टर' होऊन गेला. टी मास्टर्स म्हणजे चहा करण्याचे किंवा हा बनवण्याचे तज्ज्ञ. या लुवची गोष्ट फार सुंदर आहे.
 हा तुव उत्तम चहा करण्यासाठी पाणी कुठलं वापरावं हे सांगणारा तज्ज्ञ होता. त्याने उत्तम चहा बनवण्यासाठी पाणी कुठलं वापरावं यावर एक छान पुस्तकदेखील लिहिलं होतं. त्या पुस्तकात तो म्हणतो की नानलिंग या गावाशी यांगत्से नदीच्या मध्ये असलेल्या प्रवाहाचं पाणी चहा करण्यासाठी सर्वोत्तम.
 एकदा त्याला एका भांड्यातलं पाणी प्यायला सांगितलं आणि विचारलं की हे कुठलं पाणी आहे? त्यानं पाणी प्यायलं आणि तो म्हणाला की यांगत्से नदीतलं पाणी आहे. नानलिंग गावचंच आहे पण मधल्या प्रवाहाचं नाही. किनान्याकाठचं आहे. हे ऐकल्यावर सगळेच चपापले. खरं काय असं विचारल्यावर ज्यानं आणलं तो म्हणाला, "बरोबर आहे. मी पाणी आणलं खरं मुख्य प्रवाहातून, पण नंतर जेव्हा होडी हेदकाळून पाणी सांडतं तेव्हा मी थोडं पाणी तिथल्या किनाऱ्यावरचं भरलं."
 सगळेच चकित झाले.
 सूक्ष्मता, बारकावा, नेमकेपणा, अनुभवाचं तादात्म्य, अचूकता, ज्ञान आणि आपल्या मताशी

प्रामाणिकता.

५३। कार्यशैली