३७. पिंक पेपर
अरोरासाहेबांच्या पिंक पेपरची मला नेहमी गंमत तर वाटतेच पण थोडंसं कुतूहलही वाटतं.
आमचे जनरल मॅनेजर अरोरा हे दिवसभर वेगवेगळ्या कामांमध्ये व्यग्र असतात. फोन्सचा ओघ
चारी बाजूंनी चालू असतो. बाहेरही फिरावं लागतं. कधी टूरही असते. पण ती कुठंही असली तरी
काहीही काम करत असले तरी त्यांच्या शर्टाच्या वरच्या खिशामध्ये एक थोडा जाड असा 'पिंक
पेपर' असतो.
मला कुतूहल होतं म्हणून मी विचारलं तर अरोरांनी हसून तो 'पिंक पेपर' मला दाखवला आणि म्हणाले 'माझा गाईड आहे हा!'
मी तो पेपर उत्सुकतेने पाहिला. सकाळपासूनची करावयाची कामं ओळीनं लिहिलेली तर
होतीच पण प्रत्येक कामाला किती वेळ लागावा याचा साधारण अंदाजही होता. मध्ये मध्ये 'मोकळा
वेळ' असंही लिहिलेलं होतं. म्हणजे तिथं आयत्या वेळी येणारी कामं घेता येतील अशी व्यवस्था
होती. प्रत्येक कामासमोर त्या कामाचं उद्दिष्ट लिहिलेलं होतं.
मला हा प्रकार फारच आवडला. दिवसाच्या गाईडचा 'पिंक पेपर'.