३१. तिलांजली
सतत म्हणजे सतत शिकायला पाहिजे आणि नुसती काम करण्याची शैली नव्हे तर जीवनाची
शैली विकसित करत न्यायला पाहिजे.
आयुष्याच्या शेवटी असं वाटायला नको की आपण जगलोच नाही. सेवानिवृत्त होताना असं वाटायला नको की आपण काम केलंच नाही. शिकायला पाहिजे, जुन्या चुकांपासून आपण खूप शिकायला पाहिजे.
खूप जणांचं असं होत असणार, मला नक्की माहीत आहे. जेव्हा त्यांची त्यांच्या आयुष्याची संध्याकाळ जवळ यायला लागेल आणि ते जेव्हा मागे वळून पाहतील तेव्हा कदाचित त्यांना त्यांच्या आयुष्यातील एखादा राहून गेलेला आनंद दिसेल आणि त्यांना विलक्षण खंत वाटेल. त्यांना आठवेल काही क्षुल्लक भीतीपोटी किंवा भीड म्हणून त्यांनी त्यांच्या आयुष्यातील काही आनंद किंवा काही धमाल बाजूला ठेवलेली होती, काही अगदी नगण्य, क्षुल्लक किंवा खोट्या भीतीपोटी.
माणूस खिन्न होतो, हरतो तो असा. एखाद्या नसलेल्या गोष्टीची भीती बाळगून आयुष्याच्या अखेरीस अशी खिन्नता न यावी म्हणून आजच प्रयत्न करायला हवेत. खोट्या भीतीला तिलांजली ही द्यायलाच हवी.
४५। कार्यशैली