पान:कार्यशैली.pdf/४२

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२८. हॉर्नद्वारे संदेश



 आम्ही राहतो ती तशी जागा शांत आहे. थोडी आडबाजूची आहे. त्यामुळं सरसकट दूरची वाहनं तिथं ये-जा करत नाहीत. आमच्या गल्लीत येणाऱ्यांचीच फक्त वाहनं असतात.
 सुधीर समारेच्याच इमारतीत राहतो आणि त्याचं त्याच्या मुलीवर फार प्रेम आहे. त्यामुळं तो केव्हाही ऑफिसातून आला की विशिष्ट पद्धतीनं हॉर्न वाजवत वाजवतच घरापाशी येतो. तो हॉर्न वाजवायला लागला की मग त्याची मुलगी आतल्या खोलीत नाचायला लागते. सुधीरची गाडी पार्किंग लॉटमध्ये आली की मग तो एका विशिष्ट पद्धतीने हॉर्न वाजवतो आणि मग म्हणे मिकीला कळतं की आज डॅडींनी खाऊ आणलाय किंवा आणखी एका पद्धतीनं हॉर्न वाजवला की म्हणे त्याचा अर्थ चल आता पार्कात जाऊ. हे सगळं मला एकदा सुधीरनंच गमतीत सांगितलं आणि मी चाट पडलो.

 चौथ्या मजल्यावरच्या आतल्या बाजूच्या फ्लॅटमध्ये कोपऱ्यातल्या बेडरूममध्ये झोपलेल्या स्वत:च्या लाडक्या मुलीला संदेश देण्याचा हा नामी प्रकार ऐकून रडावं की सुधीरच्या श्रीमुखात लगावावी हेच समजेनासं झालं आहे.

४१ । कार्यशैली