पान:कार्यशैली.pdf/४१

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२७. दुसऱ्यानं मारलेली शिकार अगदी गोड गोड बोलत, चेहरा हसतमुख ठेवत वाचायला म्हणून माझं हस्तलिखित नेऊन बाबूरावांनी ते थोडा-फार बदल करून परस्पर जेव्हा छापून टाकलं आणि ते सुद्धा स्वतःच्या नावावर त्या वेळी मला त्याचं अजिबात आश्चर्य वाटलं नाही. दुसऱ्यानं मारलेल्या शिकारीवर हळूच येऊन लचका तोडून नेणारी बाबूरावांची चोरटी चाल मी पहिल्याच भेटीत अचूक हेरली होती.पण माझाही त्या शिकारीवर भरपूर ताव मारून झाल्यानं मी त्याची फिकीरच केली नाही.
 प्रश्न माझ्या शिकारीचा लचका बाबूरावांनी का तोडला हा नाही तर अशा चोरट्या बाबूरावांचा हल्ली फार सुळसुळाट वाढला आहे, हा आहे आणि त्याहूनही गंभीर बाब म्हणजे समाजाला याचं काही वाटत नाही ही आहे.

 बाबूरावांची शैली कशी असते? चोरटी, दबकत, लोचट, ओंगळ, खुशमस्करी अन् खोटारडी. कीव यावी अशी परिस्थिती. चोन्या करूनच जगायची कुणावरही वेळ येणं हे वाईटच नाही का?

कार्यशैली। ४०