Jump to content

पान:कार्यशैली.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करण्यामध्ये विलक्षण ताल मिळतो. संघटना, गट किंवा मोठ्या औद्योगिक संस्था अद्भुत अशी कामगिरी करतात आणि तीत भाग घेणान्या सर्वांचं आयुष्य प्रकाशमान आणि मंगलमय करून टाकतात.

 सुनिश्चित आणि सुरेखित ध्येय म्हणजे जादूची कांडी आहे. पण ही जादूची कांडी अशी कुठंही झाडाला लागत नाही. ती शोधावी लागते. प्रयत्न करून, कष्ट करून मिळवावी लागते. बऱ्याच संस्था, संघटनांना किंवा प्रांत अथवा देशांना ध्येयच नसतं आणि म्हणून सारे घोटाळे होतात. नुसते पैसे मिळवणं किंवा प्रसिद्धी प्राप्त करणं हे काही ध्येय असू शकत नाही. ती अभिलाषा आहे. तेव्हा ध्येयाची - जादूची कांडी शोधायला सुरुवात करू या.

३९। कार्यशैली