पान:कार्यशैली.pdf/४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
छोटी सुरुवात...


 माणूस आपल्या वागण्या-बोलण्यातून स्वतःचं मन व्यक्त करत असतो. त्याची शैली' ही त्याच्या मनाचं प्रतिबिंब असते.
 'शैली'तून माणूस कळतो, उमगतो. 'शैली'तून त्याचं अंतरंग उलगडतं, मनातली आंदोलनं समजतात.
 'कार्यशैली'तून माणूस त्याच्या कामाकडे, आयुष्याकडे कसं पाहतो हे व्यक्त होतं. 'कार्यशैली' त्याच्या वृत्तीचं प्रतिबिंब आहे. कार्यशैली' त्याच्या मनोभूमिकेचं दर्शन आहे.
 ह्या कार्यशैली'ची ऊर्जा मनाच्या खोल गाभ्यातून येते आणि म्हणून कार्यशैलीवर काम करणे म्हणजे मनाच्या जडणघडणीवर काम करणे. मन घडवणे.