पान:कार्यशैली.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२६. जादूची कांडी



 आपल्या कामाला गतिमानता कधी येते, माहीत आहे का? उत्तर सोपं आहे.
 आपल्याला कुठं जायचं आहे हे पक्कं माहीत असेल तर मग आपल्या कामाला गती येते,जोर येतो हे जसं एखाद्या व्यक्तीला लागू आहे तसं एखाद्या छोट्या गटाला किंवा अगदी मोठ्या आणि विस्तीर्ण पसरलेल्या औद्योगिक संघटनेलाही लागू आहे. अहो इतकंच काय पण देशालाही लागू आहे. कुठं जायचं आहे आणि कशासाठी हे माहीत हवं. ध्येय सुनिश्चित हवं.

 असं सुनिश्चित ध्येय मग आपोआप अनेक गोष्टी घडवतं.एक नेमकी रणनीती समोर ठेवतं. सुप्त अशा अनेक ऊर्जास्थळांना चालना देतं, काम करणाऱ्या प्रत्येकाला किंवा प्रत्येकीला त्यांच्या भूमिका स्पष्ट करतं आणि त्यांना यशात भागीदार बनवतं. सर्व बाजू आणि सर्व माणसं आपल्या सर्व शक्ती एकवटतात त्या एकवटताना एकमेकांना मदत करतात, प्रोत्साहन देतात. प्रत्येकाला वाटतं आणि पटतं की तो महत्त्वाचा आहे. तर तिची भूमिका अत्यंत आवश्यक आहे. खेळातल्या सर्वांची आयुष्यं आणि कामं यांचा मेळ बसतो. सर्वांना एक टप्पा गाठायचा आहे. एकत्र काम

कार्यशैली।३८