Jump to content

पान:कार्यशैली.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१९. हेतू जीवनाचा



 सुनीता सटकली आहे. तिच्या हातच्या स्वयंपाकाची चव सध्या बिघडली आहे. म्हणून मी म्हणतोय असं नाही किंवा पूर्वीसारखा भरभरून बोलणारा खिदळत विनोद अन् चुटकुले सांगणारा तिचा फोन सध्या येत नाही म्हणूनही माझं म्हणणं नाहीये. ती कशीही बेंगरूळ दिसते, कशीही काहीही करत, कुठलेही सिनेमे पाहत, कुणाकडंही चकाट्या पिटत फिरत राहते. तिचा मुलगा नंदू आय.आय.टी. त गेला. मुलगी माधवी कोर्ससाठी अहमदाबादला, सुहास तिचा नवरा खूप पैसे मिळवतो,तो त्याच्या कामात सतत बिझी. काय करावं सुनीताला कळतच नाही म्हणून ती सटकली.
 तिच्या आयुष्याला काही ध्येय किंवा स्वप्नंच नाही. कुठं जायचं काही माहितीच नाही आणि म्हणून ती सटकली.

 कार्यशैली काय किंवा जीवनशैली काय, प्रश्न फक्त 'स्टाइल' चा नाही हेतू' चाही आहे. उदात्त, सत्य, मनाला प्रेरणा देणारा, ऊर्जा देणारा, "हेतू' सुनीताला हवा आहे, बस्स.

२९। कार्यशैली