१६. सोंगट्या
माणसांकडे पाहण्याचे दोन प्रकार आहेत. एक आहे तो माणसांना आपल्या साध्यासाठी साधन म्हणून पाहण्याचा, माझी जिद्द आहे, माझं स्वप्न आहे, माझी मोठी आकांक्षा आहे आणि त्यासाठी मला माणसं लागणार आहेत म्हणून मला माणसं जोडायची आहेत. त्यांचं नेटवर्क उभं करायचं आहे, हा एक प्रकार आहे. माणसांना आपल्या गेममधल्या सोंगट्या म्हणून पाहण्याचा.
दुसरा प्रकार आहे माणसांना साधन म्हणून न पाहता त्यांना प्रत्येकाला स्वत:चा विकास करण्याचं स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाचं स्वत:चं म्हणून काही साध्य आहे, असं मानण्याचा प्रत्येक माणसाला
विकासाची आणि प्रगतीची संधी देण्याचा.
आपण माणसांकडं कसं पाहतो ह्याचं दर्शन आपण काम कसं करतो त्यात दिसतंच.महाराष्ट्रातल्या एका फार मोठ्या सामाजिक कार्यकर्त्याकडे मी अनेक गुणी माणसं सड़लेली पाहिली आहेत. ती असंच त्याच्या माणसांकडे 'सोंगट्या' म्हणून पाहण्यामुळं वाटतं. त्या माणसांच्या सावलीत इतर माणसं वाढतच नसतील. पण ते खरं नाही. माणूस म्हणजे झाड नव्हे. मोठा आणि नेता माणूस आपल्या सहकाऱ्यांनाही वाढू देण्याची संधी देऊच शकणार नाही का? की गेममधल्या सोंगट्या एवढंच त्यांचं महत्त्व?