पान:कार्यशैली.pdf/२०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

११. विलंब संस्कृती


 काही अनुभव फारच विचित्र आणि चमत्कारिक असतात. मी आणि वसुधा एका ठिकाणी 'रिसोर्स पर्सन' म्हणून गेलो. मुंबईहून उठून तीन दिवसांची असाइनमेंट करून परत आलो. त्या गोष्टीला आज बरोबर तीन महिने होऊन गेले. त्या ठिकाणी, तिथल्या तिथं काम पूर्ण करून दिलं तरीही तीन महिन्यानंतर आजपर्यंत आमची फी तर सोडूनच द्या पण साधा प्रवासखर्चदेखील आमच्यापर्यंत पोचलेला नाही.
 हा अनुभव काही नवीन नाही. आपल्या सर्वांना असे अनुभव येत असतातच.मी विचार केला. ज्या कंपनीसाठी आम्ही काम केलं, त्यांना पैशाची कमी नव्हती. जे काम आम्ही केलं त्याचीही त्यांना नितांत आवश्यकता होती पण तातडी होती. मग असं असलं तरीही पैसे देण्याचा असा आणि इतका विलंब का?

 मला वाटलं की दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे दुसन्याला पैसे द्यावेत अशी कळकळ आपल्याला मनापासून वाटतच नाही, म्हणजे आपली वृत्तीच अशी बनली आहे की, पैसे देण्यात विलंब करण्यातच आपण आपला फायदा मानतो आणि दुसरी गोष्ट पैसे देण्यासाठी, ते सोडण्यासाठी आपल्याकडे सुसज्ज अशी यंत्रणा नाही. कारणं आणखीही असतील पण त्यानं सर्वसाधारण कार्यक्षमता ठार मारली जाते यात शंका नाही.

१९। कार्यशैली