पान:कार्यशैली.pdf/१४४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०६. एक विलक्षण दरी


 प्रत्येकाच्या बाबतीत एक दरी असतेच असते. सुधाकरच्या बाबतीत तर ती दरी अधिकच स्पष्ट आहे आणि मोठी आहे. ती दरी म्हणजे माहीत असणं आणि करणं यातली.
 सुधाकरला हे पक्कं माहीत आहे की त्यानं सिगरेट सोडायला हवी. त्यानं त्याच्या फिटनेसवर तर परिणाम होतोच पण त्याहीपेक्षा तो आत्मविश्वास गमावून बसतो. त्याला माहीत आहे की त्यानं वाचन वाढवायला पाहिजे, पण तो ते करत नाही. तो हेही जाणून आहे की अव्यवस्थितपणानं त्याचं प्रचंड नुकसान होतं आहे. पण तरीही त्याची परिस्थिती कळत असूनही वळत नाही अशी आहे.
 असं का व्हावं? दोन-तीन कारणं आहेत. एक म्हणजे सुधाकर सवयींचा पक्का गुलाम आहे. दुसरं असं की त्याला स्वतःशी संघर्ष करण्याची अजिबात तयारी नाही.
 माहीत असणं आणि प्रत्यक्ष करणं यातली दरी कमी करणं हा एक संघर्ष आहे, पण उत्तम

जगायचं, मोठं व्हायचं तर तो संघर्ष करायलाच हवा हे सुधाकरला कळायलाच हवं.

१४३ । कार्यशैली