Jump to content

पान:कार्यशैली.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०५. 'खुशकऱ्या


 कुठल्याही कामाला नाही न म्हणणारे, कुणालाही न दुखवणारे आणि ऑफिसमध्ये कायम आनंदाचं वातावरण राहावं म्हणून काहीही करणारे म्हणजे 'खुशकरे'.
 एखादा छोटासा प्रसंग आनंदाचा आणि हलकाफुलका करण्याचं सामर्थ्य जरी या खुशकांमध्ये असलं तरी वेळेचा अपव्यय करीत, कामं पुढे पुढे ढकलत नंतर ते कोणीच करू शकणार नाही या पातळीपर्यंत आणण्याचं कसब या माणसांमध्ये असतं. या प्रकारच्या माणसांपासून अगदी सावध राहण्याची आवश्यकता आहे. कारण ही माणसं अल्पकाळापुरतं वातावरण शांत करीत असली, तरी अत्यंत महत्त्वाच्या आणि गतिशील मार्गक्रमणा करण्यात ही माणसं बाधाही आणू शकतात.
 ही माणसं भावनात्मक पातळीवर थोडी कमकुवत असतात; टीका किंवा कुणाचा रोष सहन करण्याची क्षमता यांच्याकडे बिलकूल नसते. म्हणून हो' म्हणून, 'करतो' असं सांगून वेळ मारून नेण्याचं काम ही खुशकरी माणसं करीत असतात.
 तुमच्या आसपासच्या मंडळींमध्ये अशी खुशकरी माणसं शोधा. त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवा. त्यांना फार इकडचं, तिकडचं काम करू देऊ नका आणि ते जे काम पूर्ण करतील त्याचं मग मात्र

तोंड भरून कौतुक करा.

कार्यशैली। १४२