पान:कार्यशैली.pdf/१३६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९९. चला संगं संगं एखाद्या सर्वांगसुंदर गाडीचं एक चाक समजा थोडंसं तिरकं लागलं असेल तर काय होईल? किंवा असं बघा की एखाद्या सुंदर लेखात एकच वाक्य खूप लांबलचक असेल तर काय होईल?तर सगळ्या रंगाचा बेरंग होऊन जाईल.
 कामाच्या व्यवस्थेचंही असंच आहे.सुंदर आणि संथ प्रवाहातला एखादा धोंडा आपण अलगद बाजूला करायला हवा किंवा त्याला व्यवस्थेला अनुरूप असं बनवायला हवं, सर्व व्यवस्थेच्या संगं न्यायला हवं.

 सर्व उत्तम असतं.काम अत्यंत सफाईदारपणे आणि चपळपणे होण्यासाठी सर्व व्यवस्था सज्ज असते.सर्व गोष्टी व्यवस्थित लागलेल्या असतात,फक्त शेजारच्या खोलीतून भांडी घासण्याचा आणि मोठ्यानं बोलण्याचा आवाज येत राहतो किंवा टीममधला एखादा माणूस हा सर्व परिस्थितीच्या अगदी उलट स्वभावाचा आणि प्रवृत्तीचा असतो आणि मग तो भाग बदलल्याशिवाय किंवा त्यात आमूलाग्र बदल केल्याशिवाय सर्वांगसुंदर व्यवस्था सर्वांगसुंदर राहत नाही.व्यवस्थेतील सर्वांना बरोबर घेऊन चालत राहायला हवं.त्यातला एखादा मिठाचा खडा सर्व पक्वान्नाची नासाडी करणार नाही,याची काळजी घ्यायला हवी.

१३५। कार्यशैली